नमस्कार पुणेकर…..

10 वर्षांपूर्वी India’s Most Livable City असे अभिमानाने सांगणारे आपण सर्व पुणेकर आज ट्रॅफिकच्या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. एवढा गंभीर विषय असतानाही आपल्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही आणि अत्यंत नियोजनशून्य कारभार सुरू आहे, अशी एकंदरीत भावना आपल्या सर्व पुणेकरांची झाली आहे.

त्यामुळे हा नियोजनशून्य कारभार कुठंतरी थांबायला हवा, जेणेकरून पुणेकरांची यातून मुक्तता व्हावी या उद्देशाने आम्ही “Wake Up पुणेकर” ही लोकचळवळ सुरू करत आहोत ,जी पुणेकरांच्या समस्यानिराकरणाचं हक्काचं व्यासपीठ बनेल. याच लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम आपल्यासाठी सर्वात त्रासदायक असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येवर “#अडकलाय_पुणेकर” ही मोहीम राबवत आहोत.
या मोहिमेच्या माध्यामातून ट्रॅफिक समस्येवर काम करणाऱ्या विविध एनजीओ, जागरूक नागरिक, विविध विषयांतील तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आदींना एकत्रित करून पुण्यातील प्रश्नांचे पुणेकरांच्याच माध्यमातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकचळवळीच्या माध्यमातून एकत्रित होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना संबंधित शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवून यातून ट्रॅफिकच्या समस्येमध्ये अडकलेल्या पुणेकरांची कशी लवकरात लवकर सुटका करता येईल, हा आमचा प्रयत्न आहे.
तरी सर्व जागरूक पुणेकरांना माझी विनंती आहे की, आपण आपल्या ट्रॅफिक संदर्भातील समस्या ह्या आपणास दिलेल्या QR कोडला स्कॅन करून तिथे एक प्रश्नावली दिली आहे ती भरून द्यावी आणि आपल्या बहुमूल्य सूचना आम्हांस द्याव्यात. यासोबतच #अडकलाय_पुणेकर हा हॅशटॅग आपल्या समस्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी वापरावे, ही नम्र विनंती.

मोहन जोशी
(माजी आमदार)
(संयोजक, Wakeup पुणेकर चळवळ)

Wake Up Punekar

#WakeUpPunekar या लोकचळवळीअंतर्गत पुणेकरांच्या ट्रॅफिकच्या समस्यानिराकरणासाठी #अडकलाय_पुणेकर हे अभियान आज स्वारगेट चौकात राबविण्यात आले. यावेळी स्वारगेट चौकात होणारी ट्रॅफिक आणि त्यावर आपणांस काय उपाय करता येतील यांवर पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त खाडे, पुणे मेट्रो अभियंता दीपक मानकरी आणि नागरिकांशी चर्चा केली. या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

Copyright © 2024. Design & Developed by The Social Ocean